07.03.2021: आंग्रे घराण्याचा इतिहास पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
07.03.2021: इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अश्या परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे सरखेल: आंग्रे घराण्याचा इतिहास’ या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजभवन येथे झाले.