17.02.2021: राज्यपालांच्या हस्ते हिंदुस्तानी प्रचार सभेचे ‘हिंदी पत्रिका प्रकाशन पुरस्कार’ प्रदान

17.02.2021: महात्मा गांधी यांनी सन १९४२ साली स्थापन केलेल्या हिंदुस्तानी प्रचार सभेतर्फे दिले जाणारे ‘महात्मा गांधी हिंदी पत्रिका प्रकाशन पुरस्कार’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. १७) राजभवन येथे प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाला सभेचे मानद कोषाध्यक्ष अरविंद देगवेकर, साहित्यिक मंजू लोढा, संचालक संजीव निगम तसेच हिंदी भाषिक साहित्यिक, लेखक व इतर मान्यवर उपस्थित होते.