07.02.2021 : ‘सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ राज्यपालांच्या हस्ते प्रदान
07.02.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बावधन पुणे येथे सूर्यदत्त शिक्षण संस्थेचे १९ वे सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार तसेच जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सदर पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला जैन आचार्य डॉ. लोकेश मुनी, डॉ. विजय भाटकर, भजनसम्राट अनुप जलोटा, अभिनेते रजा मुराद, सूर्यादत्त शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडीया, उपाध्यक्षा सुषमा चोरडीया प्रामुख्याने उपस्थित होते.