बंद

    26.01.2021 : प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांचे ध्वजारोहण

    प्रकाशित तारीख: January 26, 2021

    प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांचे ध्वजारोहण

    भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला उद्देशून मराठीतून संबोधन केले. (राज्यपालांच्या भाषणाची प्रत सोबत जोडली आहे)
    यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, वरिष्ठ शासकीय अधिकारी व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांनी निमंत्रितांची भेट घेतली व प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

    राजभवन येथे ध्वजारोहण

    तत्पूर्वी राज्यपालांनी राजभवन येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली तसेच उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रगीत म्हटले. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान उपस्थित होते.