29.12.2020 : राज्यपालांनी केले मोदी यांच्या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन
29.12.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भावना सोमाया यांच्या ‘लेटर्स टू मदर’ या इंग्रजी पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या मुळ गुजराती भाषेतील “साक्षी भाव” या पुस्तकाचे सदर पुस्तक इंग्रजी भाषांतर आहे. यावेळी लेखिका भावना सोमाया, विमन इन लिडरशिप संस्थेच्या प्रमुख श्वेता शालिनी, संचालिका स्वप्ना मोरे आदि उपस्थित होते.