25.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते गीता जयंती कार्यक्रमाचे उदघाटन
25.12.2020 : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यशताब्दी वर्षांनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रकवि रामधारी सिंह दिनकर स्मृति न्यासतर्फे आयोजित केलेला गीता जयंती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी न्यासाचे अध्यक्ष नीरज कुमार, विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे निवृत्त विभागप्रमुख प्रो. रतन कुमार पाण्डेय, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आर पी सिंह, लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे प्रकाश सीलम आदि उपस्थित होते. यावेळी रंगकर्मी मुजीब खान दिग्दर्शित लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील नाट्याचे सादरीकरण करण्यात आले