25.12.2020 : राज्यपालांचे अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन
25.12.2020 : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोरीवली, मुंबई येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी खासदार गोपाल शेट्टी, लदाखचे खासदार जाम्यांग छेरिंग नामग्याल, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार सुनील राणे, भाई गिरकर, योगेश सागर व मनिषा चौधरी तसेच नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.