बंद

    14.10.2020 : “हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील” : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: December 14, 2020

    “हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील” : राज्यपाल

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंद केसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू, देशातील पहिले हिंदकेसरी श्री. श्रीपती शंकर खंचनाळे यांचे कोल्हापूर येथे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. आपले आयुष्य त्यांनी कुस्तीच्या प्रचार व प्रसारासाठी वेचले तसेच अनेक उत्तम मल्ल घडवले. त्यांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.