05.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते मोबाईल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण
05.12.2020 : लोकसेवेसाठी समर्पण हेच सर्वोत्कृष्ट कार्य आहे. कोणताही भेद न बाळगता समाजकार्य करणे हाच मनुष्याचा धर्म आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास समाजात कुणीही उपेक्षित राहणार नाही. आर.के. एचआयव्ही एड्स संशोधन व सुरक्षा केंद्राने वैद्यकीय सुविधांसाठी गरजू आणि गरिब जनतेला मोबाईल मेडिकल व्हॅन अर्पण करून सामाजिक दायित्व सिद्ध केले असल्याची भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्या.