18.11.2020 : राज्यपालांच्या हस्ते मुलुंड येथील करोना योद्ध्यांचा सत्कार
18.11.2020 : श्री. चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करोना काळात जनसामान्यांची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या मुलुंड उपनगरातील २८ करोना योद्ध्यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार मिहीर कोटेचा व सचिव दिपेश वोरा प्रामुख्याने उपस्थित होते.