बंद

    16.09.2020 : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: September 16, 2020

    मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातीलआणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

    “मराठवाडामुक्तीच्या प्रदीर्घ लढ्यात अनेक ज्ञात – अज्ञात देशभक्त व्यक्तींनी आपल्याप्राणांचे बलिदान दिले. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी याऐतिहासिक लढयातील सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो तसेच सर्वांना मुक्तिसंग्रामदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो”, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.