14.05.2020 खासदार रवि किशन – राज्यपाल भेट
खासदार रवि किशन – राज्यपाल भेट
गोरखपुर येथील कामगारांच्या परतीच्या प्रवासाबद्दल चर्चा
गोरखपुरचे खासदार व अभिनेते रवि किशन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः गोरखपुर येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल त्यांनी यावेळी चर्चा केली. यावेळी रवि किशन यांच्या पत्नी देखिल उपस्थित होत्या.