राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची पोषण पुनर्वसन केंद्रास भेट
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची पोषण पुनर्वसन केंद्रास भेट
नंदुरबार : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ग्रामीण रुग्णालय मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्रास भेट दिली. त्यांच्या समवेत पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, खासदार हिना गावीत, राजभवनचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये उपस्थित होते.
श्री.कोश्यारी यांनी केंद्रातील महिलाशी संवाद साधला आणि बालकांना चॉकलेट भेट दिले. पोषण पुनर्वसन केंद्रात दिल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती त्यांनी घेतली. महिलाशी संवाद साधून औषधे व उपचार व्यवस्थित मिळतात का याबाबत विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. परिसरातील नागरिकांशीही त्यांनी यावेळी चर्चा केली.
राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मोलगी येथील सातपुडा नैसर्गिक भगर प्रक्रिया उद्योगाला श्री.कोश्यारी यांनी भेट दिली. त्यांनी भगर प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी राणी काजल लोक संचलित साधन केंद्र अक्कलकुवाच्या महिलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू आणि उत्पादनाची त्यांनी माहिती घेतली तसेच बचतगटाच्या महिलाशी संवाद साधला.