03.02.2020: मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार
03.02.2020: सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “पावसाचा निबंध” या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, अदिती अमित देशमुख, माहिती आणि प्रसारण विभागाचे सहसचिव अतुल कुमार तिवारी,वेस्ट झोन इन्फॉर्मशन ब्युरोचे महासंचालक मनीष देसाई,दिग्दर्शक व निर्मात्या उषा देशपांडे, माजी नगरपाल किरण शांताराम, राहुल रवैल, मिफ्फ महोत्सवाच्या संचालक स्मिता वत्स- शर्मा, राष्ट्रीय माहितीपटासाठीचे जुरी थॉमस वॉग, आदी मान्यवर उपस्थित होते.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the top Golden Conch and Silver Conch Awards at the Concluding Ceremony of the 16th Mumbai International Film Festival for Documentary, Short fiction and Animation films in Mumbai. Best Documentary Film while celebrated Marathi film maker Nagraj Manjule’s ‘Paavsacha Nibandh’ (An Essay of Rain) received the Silver Conch for Best Short Fiction Film