02.02.2020 प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभाग घेतलेल्या महाराष्ट्र एन सी सी कॅडेटस चा सन्मान
02.02.2020: नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेले एनसीसीचे प्रजासत्ताक दिन शिबीर तसेच अखिल भारतीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत पुरस्कारांची लयलुट करणाऱ्या राज्यातील एनसीसीच्या चमूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.