२१.०१.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राच्या वतीने उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट संस्था पुरस्कार पुणे येथील सर परशुराम महाविद्यालय सभागृह येथे देण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, केंद्राचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध देशपांडे, धनंजय कुलकर्णी, एस के जैन आदी उपस्थित होते.