१७. ०१.२०२०: राज्यपालांनी केले महालक्ष्मी सरस २०२० प्रदर्शनाचे उद्घाटन केले
१७. ०१.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज ‘महालक्ष्मी सरस २०२०’ या ग्रामीण महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादने, नाविन्यपूर्ण कला व खाद्य पदार्थांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच महिला बचत गटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्रदान केले..केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार रमेश पाटील, माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, प्रधान सचिव असीम गुप्ता, उमेद्च्या मुख्याधिकारी विमला आदि उपस्थित होते.