१२.०१.२०२० राज्यपाल यांच्या उपस्थितीत ४ थ्या ‘विवेकानंद रन फाॅर युथ’ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केल्या जाणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत ४थ्या ‘विवेकानंद रन फाॅर युथ’ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले. विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन तर्फे आयोजित या स्पर्धेतून प्लास्टिक मुक्त जीवनशैली, स्वच्छ भारत व तंदुरुस्त भारत हा संदेश देण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब, खा. गजानन किर्तीकर, अमृता फडणवीस, गोपीचंद हिंदुजा, राजेश सर्वज्ञ, आदि उपस्थित होते.