31.08.2025- राज्यपालांनी घेतले मुंबई डबेवाल्यांच्या गणरायाचे दर्शन

राज्यपालांनी घेतले मुंबई डबेवाल्यांच्या गणरायाचे दर्शन
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आराम नगर वर्सोवा मुंबई येथील टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनच्या ( मुंबई डबेवाला ) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाची पूजा व आरती केली.
यावेळी आमदार श्रीकांत भारतीय व नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी राज्यपालांचे स्वागत केले. मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे विश्वस्त रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते.