31.08.2025: जे पी नड्डा यांनी घेतली राज्यपालांची भेट

जे पी नड्डा यांनी घेतली राज्यपालांची भेट
केंद्रीय रसायन व पेट्रो रसायन मंत्री जे पी नड्डा यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी नड्डा यांनी राज्यपालांसह राजभवन येथे आगमन झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले.
मंत्री जे पी नड्डा यांनी राज्यपालांसह राजभवनातील ‘क्रान्तिगाथा’ या क्रांतिकारकांच्या भूमिगत संग्रहालयाला (बंकर म्युझियम) देखील भेट दिली.