30.08.2023 : कर्करोग मुक्त लहान मुलींकडून राज्यपालांचे रक्षाबंधन
कर्करोग मुक्त लहान मुलींकडून राज्यपालांचे रक्षाबंधन
कर्करोगावर मात केलेल्या लहान मुलींनी रक्षाबंधनानिमित्त आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी मुलींना भेटवस्तूंचे वाटप केले तसेच कर्करोग ग्रस्त मुलींसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे कौतुक केले.
यावेळी अंकीबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टच्या अध्यक्षा निदर्शना गोवाणी उपस्थित होत्या.