बंद

    31.07.2022 : राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: July 31, 2022

    राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजक व गुणवंत व्यक्तींना १४ वे भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ ए पी जे अब्दुल कलाम ग्लोबल फाउंडेशनतर्फे करण्यात आले. खेती बँकेचे अध्यक्ष डॉ डोलरराय कोटेचा, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शमीम खान व उद्योजिका कल्पना सरोज यावेळी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते कारगिल युद्धातील हिरो कर्नल शैलेंद्र सिंह, पार्श्वगायक उदित नारायण, जागतिक उद्योजक डॉ अब्दुल रझ्झाक हबीब खान, दुबई येथील खान्स मिडिया सिटीचे अध्यक्ष डॉ मोहम्मद खान, आंतरराष्ट्रीय मॉडेल केतकी वळसे, दंत चिकित्सक डॉ प्रियांका सिंह, आशिष प्रभुगावकर यांसह २५ उद्योजकांना भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आले.