बंद

    31.05.2026 सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यात पावित्र्य होते: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    प्रकाशित तारीख : May 31, 2026

    सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यात पावित्र्य होते: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    प्रसिद्ध गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुखद आहे. सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यात माधुर्य होते, तरल भाव होता व पावित्र्य होते. त्यांनी गायलेले प्रत्येक गीत थेट हृदयाला भिडणारे होते. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देव्हारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना आहे. सुमन कल्याणपूर यांचे संगीत अजरामर आहे. राज्यातील जनतेच्या तसेच संगीत रसिकांच्या वतीने मी दिवंगत सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

    **
    सुमन कल्याणपूर के गायन में पवित्रता थी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने वरिष्ठ गायिका सुमन कल्याणपूर के निधन पर गहरा दुःख व्यक्त किया है।

    राज्यपाल ने अपने शोक संदेश में कहा है कि पद्मभूषण से सम्मानित प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर के निधन का समाचार अत्यंत दुःखद है। उनके गायन में मधुरता, भावों की कोमलता और एक अद्भुत पवित्रता थी। उनके द्वारा गाया गया प्रत्येक गीत सीधे श्रोताओं के हृदय को स्पर्श करता था।

    राज्यपाल ने कहा कि सुमन कल्याणपूर के निधन से संगीत जगत का एक पवित्र देवालय मानो रिक्त हो गया है। उनका संगीत अमर है और आने वाली पीढ़ियों को निरंतर प्रेरित करता रहेगा।

    उन्होंने महाराष्ट्र की जनता तथा समस्त संगीत प्रेमियों की ओर से दिवंगत सुमन कल्याणपूर को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की तथा उनके परिजनों के प्रति अपनी गहरी शोक संवेदनाएँ व्यक्त कीं।

    **