31.05.2024: राज्यपालांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राज्यपालांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. ३१) राजभवन मुंबई येथे अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.