30.10.2024: विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट

विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे व एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव व प्रकुलगुरु प्रा. रुबी ओझा यांनी आज राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी देखील आज स्वतंत्रपणे राज्यपालांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी विद्यापीठांच्या प्रश्नांवर चर्चा झाली.