29.09.2024 : वाळकेश्वर येथील जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

वाळकेश्वर येथील जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना
भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. २९) वाळकेश्वर मुंबई येथील श्रीपाल नगर जैन मंदिर येथून झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी राज्यपालांनी जैन मुनींचे दर्शन घेतले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, विश्वस्त रमण शहा, हिऱ्यांचे व्यापारी भरत शहा, हितेंद्र मोटा आदी उपस्थित होते.