बंद

    29.07.2025: राजभवन येथे राष्ट्रपती पोलीस पदक अलंकरण समारोह संपन्न

    प्रकाशित तारीख: July 29, 2025
    29.07.2025: राष्ट्रपती पोलीस पदक अलंकरण समारोह संपन्न, राज्यपालांच्या हस्ते पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

    प्रधान सचिव (गृह) अनुप कुमार सिंह, विशेष पोलीस निरीक्षक डॉ मनोज कुमार शर्मा सन्मानित

    राजभवन येथे राष्ट्रपती पोलीस पदक अलंकरण समारोह संपन्न

    राज्यपालांच्या हस्ते 106 पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

    भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील 106 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

    राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे मंगळवारी (दि. 29 जुलै) झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये 2022 तसेच 2023 च्या स्वातंत्र्य दिनी व 2023 तसेच 2024 या वर्षांच्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

    अनुप कुमार सिंह, प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ मनोज कुमार शर्मा यांचा सन्मानित अधिकाऱ्यांमध्ये समावेश होता.

    चौसष्ठ (64) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक, चार (4) पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच अडतीस (38) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

    पोलीस अलंकरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांसह पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते अलंकृत करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांची यादी सोबत जोडली आहे.