28.11.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे दिल्लीहून रेल्वेने आगमन
राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे दिल्लीहून रेल्वेने आगमन
महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी तेजस एक्सप्रेसने नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आगमन झाले.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सागर कुलकर्णी तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. राज्यपाल मुंबई व आळंदी, पुणे येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत