27.12.2022 : राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे राजभवन येथे आगमन
राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे राजभवन येथे आगमन
नागपूर दि. २७ : राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे आज राजभवन येथे मुंबई येथून आगमन झाले. राज्यपालांच्या आगमनप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. ४ चे उपविभागीय अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर व शाखा अभियंता सचिन भोंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, शिक्षण विभाग उपसचिव प्राची जांभेकर,राजभवन नागपूर येथील राज्यपालांचे पारिवारिक प्रबंधक रमेश येवले यांची उपस्थिती होती.