बंद

    27.10.2022 : राज्यपालांच्या हस्ते ‘नवभारत आरोग्यसेवा पुरस्कार २०२२’ प्रदान

    प्रकाशित तारीख: October 27, 2022

    राज्यपालांच्या हस्ते ‘नवभारत आरोग्यसेवा पुरस्कार २०२२’ प्रदान

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे देण्यात येणारे पाचवे ‘नवभारत आरोग्यसेवा पुरस्कार २०२२’ राज्यातील सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल्स, शिक्षण संस्था व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना देण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न लता मंगेशकर यांना समर्पित नवराष्ट्र तेजोत्सव दिवाळी विशेषांकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

    कार्यक्रमाला नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी, एलेसोनिक समूहाचे अध्यक्ष कौश‍िक गांगुली, संकल्प समूहाचे पांडुरंग कदम आदी उपस्थित होते.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पीटल, ल‍िलावती हॉस्पीटल, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जसलोक हॉस्पीटल, सर एच एन रिलायंन्स फाउंडेशन हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पीटल, अपोलो हॉस्पीटल, डॉ एल एच हिरानंदानी तसेच इतर काही नामांकित हॉस्पिटल्स व संस्थांना आरोग्यसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.