26.11.2022: संविधान दिन: राजभवन येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
संविधान दिन: राजभवन येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.