बंद

    26.11.2022: राज्यपालांच्या उपस्थितीत देहरादून येथील डून विद्यापीठ येथे ‘भारतीय महिला: सत्याधारित दृष्टिकोन’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे समापन

    प्रकाशित तारीख: November 26, 2022

    राज्यपालांच्या उपस्थितीत देहरादून येथील डून विद्यापीठ येथे ‘भारतीय महिला: सत्याधारित दृष्टिकोन’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे समापन संपन्न

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यांच्या उपस्थितीत देहरादून येथील डून विद्यापीठ येथे ‘भारतीय महिला: सत्याधारित दृष्टिकोन’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे समापन संपन्न झाले. चर्चासत्राचे आयोजन डून विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ व संवर्धिनी न्यास यांनी संयुक्तरित्या केले होते.

    समारोप सत्राला राष्ट्रसेविका समितीच्या मुख्य कार्यवाह सीता गायत्री, डून विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. सुरेखा डांगवाल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव तसेच संवर्धिनी न्यासाच्या मेधा ब्रह्मपुरीकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.