26.08.2024: जन्माष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले भगवान कृष्णाचे दर्शन

जन्माष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले भगवान कृष्णाचे दर्शन
जन्माष्टमीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज जुहू मुंबई येथील इस्कॉनच्या राधा रासबिहारी मंदिरात जाऊन भगवान कृष्णाचे दर्शन घेतले व आरती केली.
यावेळी त्यांनी उपस्थित साधू समुदायाशी संवाद साधला. जुहू इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष ब्रजहरी दास, विभागीय सचिव देवकीनंदन दास, भक्ती वेदांत संस्थेचे संचालक रसराज दास व उपाध्यक्ष मुकुंद माधव दास हे उपस्थित होते.