बंद

    26.06.2025: राज्यपालांच्या हस्ते 83 पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

    प्रकाशित तारीख : June 26, 2025
    २६.०६.२०२५: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईतील लोकभवन येथे आयोजित एका अभिवादन समारंभात ८३ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदके, राष्ट्रपती पोलीस पदके आणि उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदके प्रदान केली. २०२१ आणि २०२२ च्या स्वातंत्र्यदिनी भारताच्या राष्ट्रपतींनी या पोलीस पदकांची घोषणा केली.
गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृहरक्षक दलाचे कमांडंट जनरल रितेश कुमार, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या महासंचालक अर्चना त्यागी, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि पोलीस अधिकारी, निवृत्त पोलीस अधिकारी आणि सन्मानित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय पोलिस अभिवादन समारंभात उपस्थित होते.

    राजभवन येथे राष्ट्रपती पोलीस पदक अलंकरण समारोह संपन्न

    राज्यपालांच्या हस्ते 83 पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

    राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील 83 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

    राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे गुरुवारी (दि. 26) झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये 2021 तसेच 2022 या दोन वर्षांच्या स्वातंत्र्य दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.

    एक्केचाळीस (41 ) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक, तीन (3) पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच एकोणचाळीस (39) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

    पोलीस अलंकरण समारोहाला गृह राज्य मंत्री (ग्रामीण) डॉ पंकज भोयर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महासमादेशक गृहरक्षक दल रितेश कुमार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अर्चना त्यागी, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांसह पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते पदकाने अलंकृत पोलीस अधिकारी व अंमलदारांची यादी सोबत जोडली आहे.

    List of police officers who were presented medals-26.06.2025 (1)