26.06.2024: राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. २६) राजभवन येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, विशेष कार्य अधिकारी महेश गोलानी, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.