बंद

  26.06.2021: तरुण सागरजी महाराज यांच्या ५४ व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे वृक्षारोपण

  प्रकाशित तारीख: June 26, 2021

  तरुण सागरजी महाराज यांच्या ५४ व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे वृक्षारोपण

  प्रसिध्द जैन मुनी व प्रवचनकार दिवंगत तरुण सागरजी महाराज यांच्या ५४ व्या जन्मजयंती निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन मुंबई येथे वृक्षारोपण केले.

  शरीर प्रकृतीमध्ये आजार उद्भवल्यास कडू औषध घ्यावे लागते. तसेच समाजात निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी तरुण सागर मुनी यांनी कडव्या प्रवचनांच्या माध्यमातून स्वस्थ समाज निर्मितीसाठी आयुष्य वेचले असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. सुरुवातीला राज्यपालांनी तरुण सागर मुनी यांच्या प्रतिमेजवळ दीप प्रज्वलन केले.

  यावेळी उत्तराखण्ड हज समितीचे अध्यक्ष शमीम आलम, तरुण क्रांती मंचचे अध्यक्ष जमनलाल जैन, पारस लोहाडे, महेश श्री श्रीमल, न‍िलेश शेटटी, सुनिल शेटटी, पवन पटणी, सावन चुडीवाल, हितेन्द्र मेहता आदी उपस्थित होते.