बंद

    26.01.2026: राज्यपालांचा 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संदेश

    प्रकाशित तारीख : January 26, 2026

    77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2026 रोजी
    छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभातील
    महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. आचार्य देवव्रत यांच्या संदेशाचा मसुदा

    महान संत आणि समाजसुधारकांची पवित्र भूमी असलेल्या महाराष्ट्राला नमन करत, भारतीय लोकशाहीच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

    महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

    सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या महान राष्ट्रपुरुषांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर तसेच सर्व समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुषांना मी सादर अभिवादन करतो.

    आजच्या या भव्य संचलन समारंभात सहभागी झालेले सर्व सशस्त्र दलांचे जवान आणि विद्यार्थ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो.

    आजचा हा पवित्र दिवस लोकशाही, संविधान आणि राष्ट्रीय कर्तव्यांप्रती दृढ संकल्पाचा दिवस आहे. लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून ती एक विचार, संस्कार आणि मूल्यव्यवस्था आहे. लोकशाही प्रत्येक व्यक्तीला सन्मान, प्रत्येक मताला महत्त्व आणि प्रत्येक नागरिकाला उत्तरदायित्व देते.

    आज लोकशाही ही व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या सर्व क्षेत्रांना दिशा देणारा विचार बनली आहे. सहभाग, प्रतिनिधित्व, उत्तरदायित्व, लोकसहमती आणि बंधुता लोकशाहीचा आत्मा आहेत.

    भारताची लोकशाही व्यवस्था जगातील केवळ सर्वात मोठीच नाही, तर सर्वात समृद्ध आणि मूल्यप्रधान व्यवस्थाही आहे. आपली शासनप्रणाली केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशी त्रिस्तरीय आहे. या विकेंद्रित रचनेचा उद्देश सत्ता वाढवणे नसून शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवणे हा आहे.

    लोकशाही ही भारताला बाहेरून मिळालेली संकल्पना नाही. ती आपल्या सभ्यतेच्या मुळांमध्ये रुजलेली आहे. युरोपच्या ‘मॅग्ना कार्टा’च्या कित्येक शतकांपूर्वी गुरू बसवेश्वरांनी स्थापन केलेले ‘अनुभव मंडप’ हे लोकशाही विचारमंथनाचे व्यासपीठ होते. तेथे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर लोकशाही संवाद होत असे, म्हणून त्याला भारताची पहिली संसद मानले जाते.

    आचार्य चाणक्यांच्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथात वैशालीसह अनेक प्राचीन गणराज्यांचा उल्लेख आढळतो. यावरून भारत हा लोकशाहीचा अनुयायी नसून अग्रदूत राहिल्याचे स्पष्ट होते.

    प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या संविधानाच्या महानतेची आठवण करून देतो. हा दिवस संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील सर्व सदस्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.

    संविधान अर्पण करताना डॉ. आंबेडकरांनी म्हटले होते की, देश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला आहे; मात्र सामाजिक रूढींमधून मुक्ती आवश्यक आहे. म्हणूनच संविधानात राजकीय समानतेसोबतच सामाजिक आणि आर्थिक समानतेचीही तरतूद करण्यात आली आहे.

    डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले होते की, स्वातंत्र्य आणि समानता शाश्वत ठेवण्यासाठी बंधुता अत्यावश्यक आहे. वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र बंधुतेची भावना टिकून राहिली, तर लोकशाही सशक्त आणि जिवंत राहते.

    आज ‘सर्वे भद्राणि पश्यन्तु’ ही भावना आपल्या लोकशाहीचा आत्मा बनली पाहिजे. विविधतेने नटलेल्या या देशाला एकतेच्या सूत्रात बांधणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

    स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा आणि प्रेरणास्त्रोत ठरलेले आपले राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ यंदा 150 वर्षे पूर्ण करत आहे. दीडशे वर्षांनंतरही वंदे मातरम्‌ची प्रासंगिकता आणि प्रेरणा तितकीच अखंड आहे. आजच्या तरुण पिढीने याला केवळ गीत न मानता कर्तव्य आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा म्हणून स्वीकारले पाहिजे.

    भारताबरोबरच महाराष्ट्र देखील विकास, सुशासन आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. शासन आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आत्मनिर्भर महाराष्ट्राचा संकल्प साकार होत आहे.

    सुशासनाचा अर्थ प्रत्येक नागरिकापर्यंत योजनांचा पारदर्शक आणि वेळेत लाभ पोहोचवणे आहे. लोकशाहीचे यश शासन आणि जनतेतील दृढ विश्वासावर अवलंबून असते.

    महाराष्ट्र हा केवळ भौगोलिक नाही तर भारताच्या आर्थिक प्रगतीचे सशक्त केंद्र आहे. संत परंपरा, सामाजिक जागृती आणि समृद्ध संस्कृती ही महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. समुद्रकिनारे, सह्याद्री, वनसंपदा, किल्ले, नद्या आणि पठारे महाराष्ट्राला निसर्ग संपन्न बनवतात.

    भौगोलिक आणि धोरणात्मक कारणांमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकासासाठी अत्यंत अनुकूल राज्य आहे. मजबूत पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि स्थीर धोरणे यांमुळे महाराष्ट्र गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत आहे.

    रस्ते, रेल्वे, बंदरे, ऊर्जा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. कृषी, उद्योग, व्यापार आणि वाहतूक क्षेत्रांत महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत आहे. राज्याच्या आर्थिक विकासात मुंबईची भूमिका निर्णायक राहिली आहे.

    मुंबई हे देशाचे आर्थिक राजधानीचे शहर असून येथे प्रमुख बँका आणि वित्तीय संस्था कार्यरत आहेत. शेअर बाजार आणि चित्रपटसृष्टीमुळे मुंबईची आर्थिक ताकद अधिक मजबूत झाली आहे. प्रमुख बंदर म्हणून मुंबई भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडते.

    पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरे शिक्षण, उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. ही शहरे महाराष्ट्राच्या संतुलित आणि सर्वसमावेशक विकासाला गती देत आहेत.

    सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात महाराष्ट्र डिजिटल युगातील अग्रणी राज्य आहे. उद्यमशील आणि कष्टकरी नागरिक हीच महाराष्ट्राची सर्वात मोठी ताकद आहे.

    थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र सातत्याने देशात आघाडीवर असून आज जागतिक गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह स्थान बनले आहे. राज्याने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्पष्ट आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून देशातील अग्रणी राज्य बनण्याच्या दिशेने दृढनिश्चयाने वाटचाल सुरू आहे.

    महाराष्ट्र देशातील सर्वाधिक साक्षर राज्यांपैकी एक आहे. येथील उच्च शिक्षण संस्था जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे.

    महाराष्ट्रात नुकत्याच नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून सध्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत. सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे मी आवाहन करतो.

    पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा.

    चला, आपण सर्व मिळून समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करूया.

    जय हिंद, जय महाराष्ट्र!

    ०००००

    77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभातील महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. आचार्य देवव्रत यांच्या संदेशाचा हिंदी भाषेतील मसुदा.

    • महान संतों और समाज सुधारकों की इस पवित्र भूमि महाराष्ट्र को नमन करते हुए, भारतीय लोकतंत्र के 77 वें गणतंत्र दिवस के अवसर पर मैं महाराष्ट्र की समस्त जनता को हार्दिक शुभकामनाएँ देता हूँ।

    • महाराष्ट्र के निर्माण के लिए अपने प्राणों का बलिदान देने वाले सभी शहीदों को मैं भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ।

    • सामाजिक समता, शिक्षा, महिला सशक्तिकरण और अंधश्रद्धा निर्मूलन के लिए अपना संपूर्ण जीवन समर्पित करने वाले महान राष्ट्रपुरुषों की विरासत महाराष्ट्र को प्राप्त हुई है।

    • छत्रपति शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपति शाहू महाराज, लोकमान्य बाल गंगाधर तिलक, वीर सावरकर तथा सभी समाज सुधारक और राष्ट्रपुरुषों को मैं सादर नमन करता हूँ।

    • आज के इस उत्कृष्ट परेड समारोह में भाग लेने वाले सभी सशस्त्र बलों के जवानों तथा विद्यार्थियों को मैं हार्दिक बधाई देता हूँ।

    • आज का पावन अवसर लोकतंत्र, संविधान और राष्ट्रीय कर्तव्य के प्रति संकल्प का दिन है। लोकतंत्र केवल शासन प्रणाली नहीं, बल्कि एक विचार, संस्कार और मूल्य व्यवस्था है। यह हर व्यक्ति को सम्मान, हर मत को महत्व और हर नागरिक को उत्तरदायित्व देता है।

    • लोकतंत्र आज व्यक्ति, समाज और राष्ट्र के सभी क्षेत्रों को दिशा देने वाला विचार बन चुका है। भागीदारी, प्रतिनिधित्व, जवाबदेही, जनसहमति और बंधुता लोकतंत्र की आत्मा हैं।

    • भारत की लोकतांत्रिक व्यवस्था विश्व की सबसे बड़ी ही नहीं, बल्कि सबसे समृद्ध और मूल्यों से परिपूर्ण व्यवस्था है। हमारी शासन प्रणाली त्रिस्तरीय है। केंद्र, राज्य और स्थानीय स्वशासन। इस विकेंद्रीकृत ढाँचे का उद्देश्य सत्ता का विस्तार नहीं, बल्कि सेवा को अंतिम व्यक्ति तक पहुँचाना है।

    • लोकतंत्र भारत को बाहर से प्राप्त कोई अवधारणा नहीं है। यह हमारी सभ्यता की जड़ों में समाहित है। यूरोप की ‘मैग्ना कार्टा’ से सदियों पहले गुरु बसवेश्वर द्वारा स्थापित अनुभव मंडप लोकतांत्रिक विचार-विमर्श का मंच था। सामाजिक, आर्थिक और राजनीतिक विषयों पर वहाँ लोकतांत्रिक संवाद होता था, इसलिए इसे भारत की पहली संसद कहा जाता है।

    • आचार्य चाणक्य के अर्थशास्त्र में वैशाली सहित कई प्राचीन गणराज्यों का उल्लेख मिलता है। यह प्रमाणित करता है कि भारत लोकतंत्र का अनुयायी नहीं, बल्कि अग्रदूत रहा है।

    • गणतंत्र दिवस हमें हमारे संविधान की महानता का स्मरण कराता है। यह दिन संविधान निर्माता भारतरत्न डॉ बाबासाहब अम्बेडकर जी और संविधान सभा के सभी सदस्यों के योगदान के प्रति कृतज्ञता व्यक्त करने का दिन है।

    • संविधान का लोकार्पण करते समय डॉ. अम्बेडकर जी ने कहा था-देश राजनीतिक रूप से स्वतंत्र हो गया है, लेकिन सामाजिक रूढ़ियों से मुक्ति आवश्यक है। इसीलिए संविधान में राजनीतिक समानता के साथ-साथ सामाजिक और आर्थिक समानता का भी प्रावधान किया गया।

    • डॉ. अम्बेडकर जी ने स्पष्ट कहा था, स्वतंत्रता और समानता को शाश्वत रखने के लिए बंधुता अनिवार्य है। वैचारिक मतभेद हो सकते हैं, पर यदि बंधुता का भाव बना रहे, तो लोकतंत्र सशक्त और जीवंत रहता है।

    • आज ‘सर्वे भद्राणि पश्यन्तु’ की भावना हमारे लोकतंत्र की आत्मा बननी चाहिए. विविधताओं से भरे इस देश को एकता के सूत्र में बाँधना हम सभी का कर्तव्य है।

    • जो गीत स्वतंत्रता आंदोलन की आत्मा और प्रेरणास्त्रोत बना ऐसा हमारा राष्ट्रगीत वंदे मातरम इस वर्ष 150 वर्ष पूर्ण कर रहा है। 150 वर्षों बाद भी वंदे मातरम् की प्रासंगिकता और प्रेरणा अक्षुण्ण है। आज का युवा इसे केवल गान नहीं, बल्कि कर्तव्य और राष्ट्रसेवा की प्रेरणा माने।

    • भारत के साथ-साथ महाराष्ट्र भी विकास, सुशासन और आत्मनिर्भरता की दिशा में तेज़ी से आगे बढ़ रहा है। सरकार और समाज के संयुक्त प्रयासों से आत्मनिर्भर महाराष्ट्र का संकल्प साकार हो रहा है।

    • सुशासन का अर्थ है योजनाओं का पारदर्शी और समयबद्ध लाभ हर नागरिक तक पहुँचाना। लोकतंत्र की सफलता शासन और जनता के मजबूत विश्वास पर निर्भर है।

    • महाराष्ट्र केवल भौगोलिक नहीं, बल्कि भारत की आर्थिक प्रगति का सशक्त केंद्र है। संत परंपरा, सामाजिक चेतना और समृद्ध संस्कृति महाराष्ट्र की विशिष्ट पहचान है। समुद्र तट, सह्याद्री, वन, किले, नदियाँ और पठार-महाराष्ट्र को प्राकृतिक संपदा से समृद्ध बनाते हैं।

    • भौगोलिक और रणनीतिक स्थिति के कारण महाराष्ट्र औद्योगिक विकास के लिए अनुकूल राज्य है। मजबूत बुनियादी ढाँचा, कुशल मानव संसाधन और स्थिर नीतियाँ इसे निवेशकों की पहली पसंद बनाती हैं।

    • सड़क, रेल, बंदरगाह, ऊर्जा और डिजिटल कनेक्टिविटी में महाराष्ट्र देश में अग्रणी रहा है। कृषि, उद्योग, व्यापार और परिवहन में महाराष्ट्र राष्ट्रीय नेतृत्वकारी भूमिका निभा रहा है। राज्य के आर्थिक विकास में मुंबई की भूमिका निर्णायक रही है।

    • मुंबई देश का वित्तीय केंद्र है, जहाँ प्रमुख बैंक और वित्तीय संस्थान स्थित हैं। शेयर बाजार और फिल्म उद्योग मुंबई की आर्थिक शक्ति को मजबूत करते हैं। प्रमुख बंदरगाह के रूप में मुंबई भारत को वैश्विक अर्थव्यवस्था से जोड़ती है।

    • पुणे, नागपुर, कोल्हापुर, नाशिक और छत्रपति संभाजीनगर शिक्षा, उद्योग, आईटी और नवाचार के विकास-केंद्र हैं। ये शहर महाराष्ट्र के संतुलित और समावेशी विकास को गति देते हैं।

    • साइबर सुरक्षा में महाराष्ट्र डिजिटल युग का अग्रणी राज्य है। उद्यमशील और परिश्रमी नागरिक महाराष्ट्र की सबसे बड़ी शक्ति हैं।

    • प्रत्यक्ष विदेशी निवेश के क्षेत्र में महाराष्ट्र निरंतर देश में अग्रणी रहा है और आज वैश्विक निवेशकों के लिए एक भरोसेमंद स्थान बन चुका है। राज्य ने एक ट्रिलियन डॉलर की अर्थव्यवस्था का स्पष्ट और महत्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित किया है और देश का अग्रणी राज्य बनने की दिशा में दृढ़तापूर्वक आगे बढ़ रहा है।

    • महाराष्ट्र देश के सर्वाधिक साक्षर राज्यों में शामिल है और इसकी उच्च शिक्षण संस्थाएँ विश्वभर के विद्यार्थियों को आकर्षित कर रही हैं। लोकतंत्र को मजबूत बनाने के लिए नागरिक सहभागिता आवश्यक है।

    • महाराष्ट्र में हाल ही नगरपालिका और नगरनिगम कें चुनाव संपन्न हुए. अभी जिला परिषदों के चुनाव चल रहे हैं। मैं सभी मतदाताओं से अपील करता हूँ कि वे मतदान अवश्य करें।

    • फिर एक बार गणतंत्र दिवस के अवसर पर महाराष्ट्र की जनता को हार्दिक शुभकामनाएँ।

    • आइए, हम सब मिलकर एक समृद्ध और विकसित महाराष्ट्र के निर्माण का संकल्प लें।

    • जय हिंद, जय महाराष्ट्र!