बंद

    25.12.2024 : स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपाल राधाकृष्णन यांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख: December 25, 2024
    25.12.2024 : स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपाल राधाकृष्णन यांचे अभिवादन

    स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपाल राधाकृष्णन यांचे अभिवादन

    भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. २५) राजभवन येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.