बंद

    25.09.2025 : राजभवन येथे पं.दीनदयाल उपाध्याय यांना आदरांजली

    प्रकाशित तारीख : September 25, 2025
    लोकभवनतर्फे पं दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली

    राजभवन येथे पं.दीनदयाल उपाध्याय यांना आदरांजली

    एकात्म मानवतावादाचे उद्गाते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर) राजभवन येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांना आदरांजली वाहण्यात आली.

    राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    दिनांक २५ सप्टेंबर ही पं.दीनदयाल उपाध्याय यांची जयंती ‘अंत्योदय दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते.