25.04.2025 : राज्यपालांची आर्चबिशप हाऊस येथे पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली

राज्यपालांची आर्चबिशप हाऊस येथे पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (२५ एप्रिल) कुलाबा मुंबई येथील आर्चबिशप हाऊस येथे आयोजित प्रार्थना सभेत सहभागी होऊन रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख दिवंगत पोप फ्रान्सिस यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली.
राज्यपालांनी पोप फ्रान्सिस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली आणि काही क्षण स्तब्ध उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली.
प्रार्थना सभेला मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स, विविध धर्मांचे प्रतिनिधी आणि मुंबईतील विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित होते.