25.03.2022: आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मानद डी.लिट पदवी प्रदान
आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मानद डी.लिट पदवी प्रदान
आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना महाराष्ट्राचेराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे एका विशेष दीक्षांतसमारोहात मानद डी.लिट ही पदवी प्रदान करण्यात आली. राजस्थानच्या झुनुझुनु येथीलश्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे प्रो. जगदीश मुखी यांनात्यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ योगदानाबद्दल ही मानद पदवी समारंभपूर्वकदेण्यात आली. जगदीश मुखी यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान फार मोठे आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ देशालामिळावा अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळीव्यक्त केली. श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठाने राजस्थानच्या ग्रामीण भागात महिला शिक्षणासाठी चांगले काम केल्याबद्दलमुखी यांनी संस्थेचा गौरव केला. यावेळी श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विनोदटिब्रेवाला व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यापीठाचेव्यवस्थापन करणाऱ्या राजस्थान सेवा संस्थेच्या शिक्षणसंचालिका वनश्री वालेचा यांनी मुखी यांच्या मानपत्राचे वाचन केले. जगदीश मुखी यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातूनअर्थशास्त्र विषयात पीएच. डी. प्राप्त केली असून ते दिल्ली सरकारमध्ये मंत्रीहोते. त्यांना तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘देशातील सर्वोत्तम वित्तमंत्री’ हा पुरस्कार देण्यात आला होता. सन १९८० पासून जगदीश मुखी यांनीदिल्लीतील जनकपुरी येथून सलग सात वेळा विधानसभा निवडणूकजिंकली. आसामचे राज्यपाल होण्यापूर्वी ते अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल होते.