24.09.2024: राज्यपालांची पुणे येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

राज्यपालांची पुणे येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
आपल्या पुणे दौऱ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
खा. श्रीरंग बारणे, खा. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ व संजय जगताप, नेमबाज अंजली भागवत व कवी रामदास फुटाणे आदींनी आज राज्यपालांची भेट घेतली.