बंद

    24.02.2026 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आज मुंबई येथे आगमन

    प्रकाशित तारीख : February 24, 2026
    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आज मुंबई येथे आगमन

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आज मुंबई येथे आगमन

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आज मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुंबईच्या महापौर रितू तावडे आदींनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

    मुंबईतील पी डी हिंदुजा हॉस्पिटलच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘सेविंग लाइव्ह्ज अँड बिल्डिंग हेल्दीअर भारत’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. दिनांक २५ रोजी राष्ट्रपती शेगाव येथे राष्ट्रीय आयुर्वेद मेळाव्याला उपस्थित राहणार असून संध्याकाळी नागपूर येथे ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.