बंद

    24.02.2023 : डॉ देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: February 24, 2023

    डॉ देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती, माजी आमदार डॉ देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    डॉ देवीसिंह शेखावत हे उत्तम जनसंपर्क असलेले एक लोकप्रिय नेते होते. अमरावतीचे पहिले महापौर तसेच विधान मंडळाचे सदस्य या नात्याने त्यांनी चांगले काम केले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. दिवंगत डॉ देवीसिंह शेखावत यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना श्रीमती प्रतिभाताई पाटील व त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे