23.07.2026: लोकभवन येथे कीटकजन्य व जलजन्य आजार जनजागृती शिबिर संपन्न
लोकभवन येथे कीटकजन्य व जलजन्य आजार जनजागृती शिबिर संपन्न
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या सुचनेनुसार लोकभवनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘कीटकजन्य व जलजन्य आजार प्रतिबंध व उपचार’ या विषयावर गुरुवारी (दि. २३) एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र लोकभवनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी कीटकजन्य व जलजन्य आजार प्रतिबंध व उपचार याबाबत मार्गदर्शन केले. शिबीरात ११० कर्मचाऱ्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांच्या घरोघरी जाऊन कुटुंबियांच्या रक्ताची तपासणी केली
राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या वैदयकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. लोकभवन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ विक्रमजीत पडोळे यांनी शिबीर आयोजनात सहकार्य करणाऱ्या वैदयकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.