बंद

    23.07.2025: लोकमान्य टिळक यांना १६९ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    प्रकाशित तारीख: July 23, 2025
    23.07.2025: भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६९ व्या जयंती निमित्त राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राजभवन येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

    लोकमान्य टिळक यांना १६९ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६९ व्या जयंती निमित्त राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी (दि. २३) राजभवन येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला अभिवादन केले.