23.07.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ
राज्यपाल रमेश बैस यांनी केलेल्या पूजेनंतर मंगळवारी (दि. २३) राजभवनातील एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ झाला.
यावेळी राज्यपालांनी देवीचे दर्शन घेतले व हार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी, महादेव, प्रभू राम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले.
गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनातील एक दिवसाची यात्रा भरते.
राजभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते.
पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.