बंद

    23.02.2026: राज्यपालांचे संत गाडगे बाबा यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : February 23, 2026
    23.02.2025: राज्यपालांचे संत गाडगे बाबा यांना अभिवादन

    राज्यपालांचे संत गाडगे बाबा यांना अभिवादन

    संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सोमवार (दि. २३) लोक भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी व लोकभवन येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांनी संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले.