बंद

    23.02.2023 : राज्यपाल बैस यांचे संत गाडगे बाबांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: February 23, 2023

    राज्यपाल बैस यांचे संत गाडगे बाबांना अभिवादन

    संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनी देखील संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

    राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.