22.12.2022 : राज्यपाल कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट; संध्या आरतीला उपस्थिती
राज्यपाल कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट; संध्या आरतीला उपस्थिती
नागपूर भेटीवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. २२) धंतोली येथील रामकृष्ण मठाला भेट दिली व सर्व भक्तांसह संध्या आरती केली.
राज्यपालांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन घेतले तसेच माताजी श्री सारदा देवी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना वंदन केले. त्यानंतर आश्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध सेवाकार्यांबद्दल माहिती जाणून घेतली व विवेकानंद धर्मादाय मल्टी थेरपी डिस्पेन्सरी, ग्रंथालय व प्रकाशन विभागास भेट दिली.
मठाचे अध्यक्ष स्वामी ब्रह्मस्थानंद यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी स्वामी विपाप्मानन्द, स्वामी ज्योतिस्वरूपानंद, स्वामी तन्निष्ठानंद, स्वामी ज्ञानमूर्त्यानंद व इतर साधुवृन्द उपस्थित होता. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थी स्वयंसेवक तसेच भक्तवर्गाची देखील चौकशी केली.